18.9 C
New York

Achyut Potdar : चित्रपटांमध्ये धमाकेदार भूमिका साकारणारे अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन

Published:

बॉलिवूडमधील चरित्र अभिनेते अच्यूत पोतदार (Achyut Potdar) आज काळाच्या पडद्याआड गेले. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात प्राध्यपकाची भूमिका साकारणारे दिग्गज अभिनेता अच्यूत पोतदार यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्यांनी ते ग्रस्त होते. काल रात्री त्यांची तब्यत बिघडली आणि ते बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज (19 ऑगस्ट, मंगळवार) दुपारी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मराठी कुटुंबातील अच्यूत पोतदार यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी आणि हिंदी माध्यमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्या. अनेक मराठी अभिनेते, अभिनेत्री, राजकीय व्यक्ती त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या निधनाची घटना अत्यंत दुःखद आहे. मराठी आणि हिंदी कलाक्षेत्रातील एक हृदयस्पर्शी कलाकार ही त्यांची ओळख. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो! तसेच त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, अशी प्रार्थना करत दिवंगत अभिनेता अच्यूत पोतदार यांना श्रद्धांजली वाहिली.

Achyut Potdar या चित्रपटांमध्ये केलं काम

आक्रोश,
अर्ध सत्य,
तेजाब,
परिंदा,
दिलवाले,
ये दिलगी,
रंगीला,
व्हाय अल्बर्ट पिंटो को गुस्सा आता है
राजू बन गया जेंटलमन

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img