महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. अतिमुसळधार पावसामुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. मुंबईसाठी पुढील 10-12 तास धोक्याचे असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयात राज्यातील पाऊसपाण्याचा आढावा घेतला, त्यानंतर मुख्यमंत्री माध्यमांसोबत बोलत होते.मुंबई पर्यटन
Devendra Fadnavis नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनाशी राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन सतत संवाद सुरू आहे. रेड आणि ऑरेंज अलर्ट 15 ते 16 जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. कोकणात रेड अलर्ट जारी असून अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. बारकाईने या भागातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. सैन्याची आणखी छत्रपती संभाजीनगरमधून एक तुकडी रवाना करण्यात आली आहे.
राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नुकसानग्रस्त भागात तत्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून वेगाने मदत कार्य सुरु आहे असेही ते म्हणाले. मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा विभागात बीड, लातूर, नांदेडमध्ये पूर स्थिती आहे. महाराष्ट्रात चार लाख हेक्टरवरील पीकं बाधित झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बीड आणि लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात पीकं बाधित झाले.
Devendra Fadnavis समुद्रात उसळणार प्रचंड लाटा
समुद्राच्या लाटा आज संध्याकाळी तीन मीटर आणि उद्या चार मीटरपर्यंत उसळण्याची शक्यता आहे. समुद्राची पातळी व पावसाचं पाणी एकत्र येऊन यामुळे पूरस्थिती गंभीर होऊ शकते. मोठ्या प्रमाणात मुंबई महापालिकेकडून पाणी पंपिंगची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीधोकादायक ठिकाणी नागरिकांनी जाण्याचं टाळावं, विशेषतः समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा आनंद घेण्याच्या मोहाला बळी पडू नये, असं आवाहन केलं.