संपूर्ण महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या निर्घृण हत्येनं हादरून गेला होता. या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला (Valmik Karad) या प्रकरणात अटक करण्यात आली असून तो सध्या कारागृहात आहे. दरम्यान, त्याच्या जामिनाच्या अर्जावर झालेल्या सुनावणीत महत्त्वाचे दावे समोर आल्याने प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
Valmik Karad अटकेच्या वेळी कारणे…
वाल्मिक कराडच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामिनाच्या अर्जावर न्यायालयीन सुनावणी पार पडली. बचाव पक्षाच्या वकिलांनी, आरोपीला यावेळी अटक करताना त्याला अटकेची कारणे स्पष्ट करण्यात आली नव्हती, असा युक्तिवाद (Beed News) केला. या मुद्द्यामुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे. मात्र, या युक्तिवादावर न्यायालय काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Valmik Karad उज्वल निकमांचा कडवा विरोध
सरकारतर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी आरोपीच्या जामिनाला जोरदार विरोध केला. निकम म्हणाले, आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी युक्तिवाद केला असला, तरी आम्ही त्याविरोधात ठोस मुद्दे न्यायालयासमोर मांडले. दुसरा आरोपी विष्णू चाटे यानेदेखील दोषमुक्तीसाठी युक्तिवाद केला होता. मात्र, आम्ही न्यायालयाचे लक्ष महत्त्वाच्या पुराव्यांकडे वेधले.
Valmik Karad बंधू धनंजय देशमुखांचा संताप
हत्या झालेल्या संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनीही या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, आरोपींचे वकील त्यांना निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, निकम साहेबांनी त्यांच्या सर्व मुद्द्यांना ठोस प्रतिउत्तर देत आरोपींचा सहभाग सिद्ध केला. हे आरोपी आहेत आणि त्यांच्या मागे कोण आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. पुढच्या तारखेला चार्ज फ्रेम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे आणि नियती कोणालाही वाचवणार नाही.
Valmik Karad पुढील सुनावणी निर्णायक
30 ऑगस्टला या प्रकरणातील जामिनाबाबतचा अर्ज आता पुन्हा न्यायालयीन सुनावणीस येणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्येच्या तपासात आणि आरोपींविरुद्धच्या कारवाईत पुढे कोणता टप्पा गाठला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.