ओतूर Otur ,प्रतिनिधी:दि.१८ ऑगस्ट ( रमेश तांबे )
ओतूर ( ता.जुन्नर ) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर चौथ्या श्रावणी सोमवार यात्रे निमित्त सोमवारी दि.१८ रोजी पहाटे सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुमारे दोन लाखांच्यावर भाविकांनी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर तयार करण्यात आलेल्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे गुरू, श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने, सोमवारी पहाटेपासूनच मंदिरासमोर महिला व पुरूषांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
चौथा श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या चार कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.पहाटे बबन बाबुराव भोर, प्रवीण हिंदुराव गाडे, कुमुदिनी चव्हाण, इंदिरा विकास डावरे अस्वार, शिवाजी शंकरराव डुंबरे,विशाल तांबे,डॉ.गणेश दामा,वैशाली नायकोडी गाढवे व श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक,आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यावेळी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे सचिव महेंद्र ( गांधी ) पानसरे, रघुनाथ तांबे,शांताराम वाकर,प्रकाश डुंबरे,राजेंद्र डुंबरे, शांताराम पानसरे,माऊली पानसरे,ज्ञानेश्वर पानसरे,रोहिदास घुले, गोपाळ घुले,शांताराम शिंगोटे,धर्मनाथ पानसरे,सखाराम बापू डुंबरे,सतीश तांबे,राजेंद्र हांडे,संजय डुंबरे, अक्षय तांबे,अमोल तांबे, राहुल डुंबरे.कुमार सोनल डुंबरे मनोज डुंबरे व श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे पदाधिकारी व भाविक उपस्थीत होते.
श्री कपर्दिकेश्वर स्विमिंग अँड वॉकिंग ग्रुप,लक्ष्मी ज्वेलर्स सुळे बंधू ,रेणुका ज्वेलर्स गडदरे बंधू व श्रेयस पाटील डुंबरे मित्रपरिवाराच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
दुपारी अडीच वाजता श्री कपर्दिकेश्वर मंदिराजवळील श्रीकृष्ण तांबे कुस्ती स्टेडियममध्ये कुस्त्यांचा आखाडा भरला होता.ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेतील भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते.नारायणगाव एसटी आगाराच्या वतीने यात्रेकरूंसाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली होती.यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.