21.7 C
New York

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Published:

मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू (Mumbai Rain Update) असल्याने सुट्टी देण्यात आलीये. पुढील काही तास अतिमुळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय. अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोकलची वाहतूक मंदावली आहे. पुढील काही तास अति धोक्याची असल्याने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. काल रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. अगोदर ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला होता. मात्र, आता मुंबईला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय.

पावसाचा इशारा (रेड अलर्ट) मुंबईला अतिमुसळधार असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारच्या सत्रात मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज, सोमवार सुटी जाहीर केल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महानगरपालिका आयुक्तांचे यासोबतच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेनिर्देश आहेत. नागरिकांनी आवश्यकता असेल तरचघराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले. बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी 12 वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सोमवार, दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सुटी जाहीर केली आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडूनअसे आवाहन करण्यात येत आहे.

काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात येत आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याचे चित्र फक्त मुंबईच नाही तर राज्यातील अनेक भागात सध्या आहे. राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेऊन आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागाचा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img