22.5 C
New York

Dahi Handi 2025 : विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!

Published:

राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला (Dahi Handi 2025) मिळत आहे. मुंबईत आज शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) एकीकडे पावसाने जोर धरलेला असताना दुसरीकडे गोविंदा पथकांमध्ये उत्साह ओसंडून पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, ठाणे या भागांमध्ये दहीहंडीचे मोठ्या प्रमाणात आणि भव्य दिव्य असे आयोजन केले जाते. तर आता मोठ्या संख्येने होणाऱ्या आयोजनांमुळे गोविंदा पथकांची सुद्धा संख्या वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जोगेश्वरीतली जय जवान, कोकणनगर आणि आर्यन्स गोविंदा पथकाने 9 थर लावत विक्रम केला आहे. कोकणनगर गोविंदा पथकाने पण यंदाच्या वर्षी मात्र या तीन गोविंदा पथकांपैकी एक असलेल्या या 9 थरांचा विक्रम मोडित काढला आहे.

काही वर्षांपूर्वी जोगेश्वरी पूर्वेतील जय जवान गोविंदा पथकाने 9 थर रचत विश्वविक्रम रचला होता. ज्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा रंगली. दरवर्षी 9 थर जय जवान गोविंदा पथकाने उपनगरचा राजा अशी ओळख मिळवणाऱ्या रचले. तर त्यांच्याच बरोबरीने जोगेश्वरी पूर्वेतीलच कोकणनगर आणि आर्यन्स गोविंदा पथकाने सुद्धा 9 थर रचविण्याचा मान मिळवला. पण यंदाच्या वर्षी जय जवान गोविंदा पथकाने 10 थर रचणार असा निर्धार केला होता. त्याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण दरवर्षी 9 थर जय जवान गोविंदा पथकाच्या आधी त्यांचा विक्रम मोडीत 10 थर रचत नवा विक्रम केला आहे. कोकणनगर गोविंदा पथकाने जय जवान पथकाने सुरुवातीला रचलेल्या 9 थरांचा विक्रम मोडित काढत 10 थर रचले आहेत.

कोकणनगर गोविंदा पथकाने सकाळीच ठाण्यातील दहीहंडीच्या कार्यक्रमांकडे धूम ठोकली. मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक ठाण्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे दरवर्षी आयोजन करत असतात. “संस्कृतीची हंडी” म्हणून सरनाईकांची ही हंडी ठाण्यासह मुंबईत प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक पथक या ठिकाणी सलामी देण्यासाठी पोहोचत असतात. अशातच आता याच संस्कृतीच्या हंडीमध्ये 9 थरांचा विक्रम मोडत 10 थर रचण्याचा मान आणि विक्रम कोकणनगर दहीहंडी पथकाकडून करण्यात आला आहे. कोकणनगर पथकाकडून पूर्वेश सरनाईक यांना 10 थर रचू, अशा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार, संस्कृतीच्या हंडीमध्ये कोकणनगरने 10 थर लावत नवीन विक्रम केला आहे. त्यांनी 10 थरांचा विक्रम केल्याने या पथकाला संस्कृती दहीहंडी आयोजकांकडून 25 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img