23.2 C
New York

Heavy Rain : राज्यात पुढील 24 तास महत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट

Published:

मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ (Maharashtra Rain) घातला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भासह अन्य जिल्ह्यांत तुफान पाऊस (Heavy Rain) होत आहे. हवामान विभागाने पावसाचा जोर आता आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा नवा अंदाज (IMD Rain Alert) व्यक्त केला आहे. मुंबईत मुसळधार (Mumbai Rains) पाऊस काल रात्रीपासूनच सुरू झाला आहे. आज सकाळीही पाऊस होतच आहे. आज राज्यात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.पावसाचीही हजेरी या उत्सवात राहिल असा अंदाज दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज आणि उद्या मुंबई, ठाणे ज जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्यात असून रेड अलर्ट या जिल्ह्यासाठी जारी (Red Alert) करण्यात आला आहे. पालघर ठाणे आणि मुंबईसाठी शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. आता उद्यापासून पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Heavy Rain रायगडात अतिवृष्टी तर पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार

राज्यात पुढील 24 तासांत कोकणात अतिमुसळधार तर रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रत्नागिरी, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. घाट माथ्यावर मात्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत असून अन्य जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे. पुढील तीन ते चार तासांत आताही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसारअहिल्यानगर जिल्ह्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img