22.8 C
New York

Rohit Pawar : ‘त्या’ टिकेवरून अजितदादांचा रोहित पवारांना टोला

Published:

राज्याच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी एक मोठी घडामोड घडली. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी चव्हाणची नियुक्ती करण्यात आली. खासदार सुनील तटकरे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रही देण्यात आले.

या प्रकारावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. जोरदार टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही केली. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) पक्षातील भाजपप्रेमी गट अजितदादांची प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका केली होती. त्यांचा सगळा रोख खासदार सुनील तटकर यांच्याकडे होता. त्यांच्या याच टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काही जणांना वाटतं आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडेच आहे. त्यांनी (रोहित पवार) त्यांच्या पक्षाचं पाहावं. आम्ही आमच्या पक्षाचं बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी रोहित पवारांना उत्तर दिलं.

Rohit Pawar काय म्हणाले होते रोहित पवार

खरमरीत पोस्ट शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता. परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांची प्रतिमा अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून खराब करण्यासाठी कार्यरत असतो.

कालची वादग्रस्त नियुक्ती ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं. नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img