22.8 C
New York

Dahi Handi : गोकुळाष्टमीनिमित्त महाराष्ट्रभर दहीहंडी उत्सवाचे मोठे आयोजन

Published:

आज गोकुळाष्टमीचा सण.. राज्यात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह उपनगरांत आज दहीहंडीची मोठ्या प्रमाणात धूम पहायला मिळत आहे. ढाक्कू माकूम, ढाक्कू माकूम.. मच गया शोर सारी नगरी या गाण्यांवर ताल धरत, मुसळधार पाऊस असूनही जराही उत्साह कमी न होऊ देता गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि पालिकेच्या निवडणुकी निमित्त या अनेक राजकीय पक्षांकडून दहीहंडीचा आयोजन मुंबई शहर आणि उपनगरात करण्यात आलं आहे. दादर येथील आयडियल बुक डेपो जवळील साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाला सुरवात झाली आहे. या दहीहंडी उत्सवात महिला गोविंद पथक हे सहभागी झालं आहे. तेजस्विनी महिला गोविंदा पथकाकडून आयडियल बुक डेपो येथील दहीहंडीला सलामी देण्यात आली.

ठाण्यातही भव्य दिव्य गोकुळ हंडीचे आयोजन ठाण्यात अल्पावधीतच प्रतिष्ठेची दहीहंडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने कॅसलमिल येथील गोकुळ हंडी चे भव्य दिव्य आयोजन कृष्णा पाटील यांनी केलं आहे. ठाणे शहरातील गोविंदा पथकांमध्ये सलामी देण्यामध्ये मोठी चुरस असून, सकाळच्या सुमारास या ठिकाणी ठाणे शहरातील असंख्य गोविंदा पथकांचे प्रतिनिधी आपल्या गोविंदा पथकांची नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे आहेत. यावरूनच या दहीहंडीचा नावलौकिक मोठा असल्याचा दिसून येत आहे.

Dahi Handi कल्याण-डोंबिवलीत 325 दहीहंड्यांचा जल्लोष, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान यंदा कल्याण-डोंबिवलीत खासगी 275 व सार्वजनिक 50 मिळून एकूण 325 दहीहंड्या फोडल्या जाणार आहेत. राजकीय नेते व सेलिब्रिटींची उपस्थिती गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी राहणार. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी चौकातील शिंदे-ठाकरे गटाच्या समोरासमोरच्या दहीहंड्या या विशेष आकर्षण ठरणार आहेत.

मात्र दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, त्याच पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी SRPF तुकडी, 22 निरीक्षक, 71 अधिकारी आणि 600 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आज मानवी मनोरा रजत अनेक दिवसापासून सराव करणाऱ्या गोविंदा दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटणार आहेत. गोविंदाच्या सुरक्षेसाठी अनेक सार्वजनिक व खाजगी मंडळाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img