23.2 C
New York

Mumbai Rains : विक्रोळीत दरड कोसळून 2 दोघांचा मृत्यू, झोपेतच काळाचा घाला !

Published:

काल रात्रीपासून मुंबई व उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा जोर (Mumbai Rains) कायम आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक (Heavy Rain in Mumbai) सखल भागात पाणी साचले असून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट, तर ठाण्यासाठी १६ व १७ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे मुंबईत एक दुर्घटना घडली. येथील विक्रोळी भागातील एका घरावर दरड कोसळली. या दुर्घटनेत कुटुंबातील वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिश्रा कुटुंबाच्या घरावर दरड कोसळून सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप-लेकीचा मृत्यू झाला. इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर अग्निशमन दल व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होतें.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस मुंबई, कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Rains मुंबईत पाणीच पाणी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या दादर, चुनाभट्टी, कुर्ला व विद्याविहार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दादर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे .

Mumbai Rains मुंबईत मुसळधार पावसाचाअलर्ट

काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार (Mumbai Rains) पाऊस सुरू झाला आहे. आज सकाळीही पाऊस होतच आहे. आज हवामान विभागाने मुंबईसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर जाण्याचे टाळावे. समुद्रकिनारी व सखल भागात जाऊ नका असा इशारा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिला आहे. मुंबई पोलीस सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100/112/113 डायल करा असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे. आताही हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तासांत अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img