सध्याच्या धावपळीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेकांना व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता भासत आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव, जंक(Junk Food) फूडचे प्रमाण वाढणे आणि योग्य पोषण न मिळाल्यामुळे ही समस्या वाढते. हाडांच्या बळकटीपासून ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यापर्यंत व्हिटॅमिन डीची भूमिका महत्वाची असते, मात्र त्याची कमतरता शरीर वेगवेगळ्या पद्धतीने दर्शवते.
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन डी कमी असल्यास सतत थकवा जाणवणे, झोपेचे विकार, हाडे व सांध्यांमध्ये वेदना, मूड स्विंग (Mood Swings), चिंता, नैराश्य, केसगळती, वजन वाढणे अशी लक्षणे दिसतात. विशेषतः 40 वर्षांवरील महिलांमध्ये हाडांची झीज व ऑस्टिओपोरोसिसचा धोका अधिक असतो.
ही कमतरता भरून काढण्यासाठी नियमितपणे सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात काही वेळ घालवणे उपयुक्त आहे. तसेच आहारात चरबीयुक्त मासे, अंड्याचा पिवळा भाग, फोर्टिफाइड दूध, दही, रस यांचा समावेश करावा. गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेता येतात. योग्य आहार आणि सवयींमुळे ही समस्या टाळता येते आणि शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारता येते.