22.2 C
New York

Virat Kohli : विराट कोहलीचा सराव पोस्टने दिला ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजचा संकेत!

Published:

भारतीय क्रिकेटचा स्टार आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 आणि कसोटी क्रिकेटला आधीच निरोप दिला आहे. त्यामुळे आता तो वनडे क्रिकेटलाही अलविदा करणार का, याबाबत चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. बांगलादेशविरुद्धची (Bangladesh) ऑगस्टमधील वनडे मालिका रद्द झाल्यानंतर, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका कोहलीच्या करिअरसाठी निर्णायक मानली जात आहे.

अलीकडेच कोहलीने सोशल मीडियावर इनडोअर नेट सेशनमधील एक फोटो शेअर केला आहे. यात तो गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईम अमीन यांच्यासोबत सराव करताना दिसतो. “भाऊ, चेंडू खेळायला मदत केल्याबद्दल धन्यवाद. तुला भेटून नेहमीच छान वाटतं,” अशी कॅप्शन देत कोहलीने आपली तयारी दाखवून दिली.

क्रिकेट फॅन पेजवर या फोटोसह “ऑस्ट्रेलिया वनडे सीरीजची तयारी” असेही नमूद करण्यात आले, आणि महत्त्वाचे म्हणजे कोहलीने स्वतः ही पोस्ट लाईक केली. यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. मात्र, रोहित शर्मा आणि कोहली या मालिकेनंतर किंवा त्याआधी निवृत्ती जाहीर करतील का, याबाबत अद्याप संभ्रम आहे. जर ते खेळले, तर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना या मालिकेत अविस्मरणीय कामगिरी करावी लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img