22.2 C
New York

Vastu Tips : वास्तूनुसार स्वयंपाकघरातील या 5 चुका टाळा, कुटुंबाच्या आरोग्यावर होणार नाही वाईट परिणाम

Published:

घरात स्वयंपाकघर हे केवळ अन्न तयार करण्याचं ठिकाण नसून, ते घराच्या उर्जेचं केंद्र मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार काही सोप्या पण महत्त्वाच्या नियमांचं पालन केल्यास आरोग्य आणि आनंद कायम राहतो. पण अनेकदा नकळत केल्या जाणाऱ्या काही चुकांमुळे कुटुंबातील सदस्य आजारी पडण्याचा धोका वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणं सर्वात शुभ मानलं जातं. जर ते ईशान्य किंवा उत्तर दिशेला असेल, तर त्या दिशेत लाल टाईल्स किंवा बल्ब लावून दोष कमी करता येतो. गॅस स्टोव्ह आणि पाण्याचा नळ अगदी जवळ असणं टाळावं. यामध्ये किमान दीड फूट अंतर ठेवणं उत्तम; शक्य नसेल तर लाकडी फळीने वेगळं करा. स्वयंपाक करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. दाराकडे पाठ करून स्वयंपाक करणं अशुभ मानलं जातं. स्वयंपाकघरात औषधं ठेवणं टाळा; ती नेहमी बाहेर, थंड आणि कोरड्या जागेत साठवा. तुटकी, गंजलेली किंवा न वापरली जाणारी भांडी व उपकरणं काढून टाका.

शुभतेसाठी स्वयंपाकघरात हलका पिवळा, क्रीम किंवा नारिंगी रंग वापरा, रोज सकाळी कापूर जाळा आणि तुळशीचं रोप ठेवा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img