22.2 C
New York

Tehran : ‘तेहरान’मध्ये जॉन अब्राहमचा दमदार अंदाज ॲक्शनसोबत हृदयाला भिडणारी कहाणी

Published:

अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या ‘वेधा’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत एकाच प्रकारचे चित्रपट करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली होती, पण नंतर माफीही मागितली होती. मात्र, त्याचे खरी उत्तर त्याने आपल्या कामातूनच दिले आहे. नुकताच झी5 वर आलेला ‘तेहरान’ (Tehran) हा त्याचाच पुरावा आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी 2012 मधील भारतात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. इस्रायली राजदूतांवर हल्ला होतो आणि त्यात फुलं विकणारी एक मुलगी मृत्युमुखी पडते. हा हल्ला इराण-इस्रायल वैरातून उद्भवतो, परंतु घटनास्थळ भारत असतो. तपासाची सूत्रे एसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) यांच्या हाती येतात. सुरुवातीला पाकिस्तानचा संशय असतो, पण तपास जसजसा पुढे जातो तसतशी आंतरराष्ट्रीय राजकारण, मुत्सद्देगिरी आणि गुप्त कारवायांची गुंतागुंत उलगडत जाते. गुन्हेगारांच्या शोधात राजीव तेहरानपर्यंत पोहोचतो आणि पुढील कथा रोमांचक वळण घेते.

कथा पूर्णपणे समजून घेण्यासाठी इराण, इस्रायल आणि भारत यांचे संबंध थोडेफार माहीत असणे उपयुक्त ठरते. चित्रपटात ॲक्शनचा वापर केवळ थरार वाढवण्यासाठी नव्हे, तर कथानकाला आधार देण्यासाठी करण्यात आला आहे. काही संवाद फारसी भाषेत असल्याने सबटायटल्सवर लक्ष ठेवावे लागते, जे थोडे अडचणीचे वाटू शकते. पटकथेत काही ठिकाणी कमतरता जाणवते आणि काही मुद्दे अधिक सोप्या भाषेत मांडता आले असते.

अभिनयाच्या बाबतीत, जॉनने केवळ ॲक्शनच नाही तर भावनिक बाजूही प्रभावीपणे साकारली आहे. नीरू बाजवा, मानुषी छिल्लर, मधुरिमा तुली, दिनकर शर्मा आणि हादी खंजनपूर यांनीही आपल्या भूमिकांमध्ये चांगली छाप सोडली आहे. दिग्दर्शक अरुण गोपालन यांच्या मार्गदर्शनाखाली रितेश शाह, आशिष वर्मा आणि बिंदानी कारिया यांनी कथा लिहिली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img