22.2 C
New York

Rubina Dilaik : रुबिना दिलैकचं पतीचं कौतुक सोशल मीडियावर वादग्रस्त ठरलं

Published:

टेलिव्हिजनमधील लोकप्रिय जोडी रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) सध्या त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत. ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga)या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या या जोडप्याला एका टास्कदरम्यान रुबिनाला विचारण्यात आलं की, तिला पतीची कोणती गोष्ट सर्वाधिक आवडते. उत्तर देताना रुबिनाने पाटीवर हिप दर्शवणारा इमोजी काढून सांगितलं की, तिला अभिनवचा पार्श्वभाग आणि हिप खूप आवडतो. ती पुढे म्हणाली, फिट शर्ट आणि कार्गो पँटमध्ये त्याचा लूक तिला नेहमीच आकर्षक वाटायचा.

रुबिनाचं हे स्पष्ट वक्तव्य ऐकून अभिनव स्वतः थोडा गोंधळलेला दिसला. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच काहींनी तिच्या खुल्या प्रतिक्रियेचं कौतुक केलं, तर काहींनी ती मर्यादा ओलांडल्याची टीका केली. “जर अभिनवने असं विधान रुबिनाबद्दल केलं असतं, तर लोकांनी वेगळी प्रतिक्रिया दिली असती” असंही अनेकांचं म्हणणं आहे.

२०१८ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडप्याने ‘बिग बॉस 14’मध्येही एकत्र सहभाग घेतला होता. ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये हिना खान-रॉकी जैस्वाल, अविका गौर-मिलिंद चंदवानी, डेबिना बॅनर्जी-गुरमीत चौधरी, स्वरा भास्कर-फहाद अहमद आणि गीता फोगट-पवन कुमार यांच्यासह अनेक सेलिब्रिटी जोड्या आपल्या खासगी आयुष्याचे किस्से प्रेक्षकांसमोर मांडत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img