22.2 C
New York

Bipasha Basu reacts as Mrunal Thakur’s comment on her goes viral : मृणाल ठाकूरच्या जुन्या वक्तव्यावरून वाद बिपाशा बासूने दिलं सशक्त प्रत्युत्तर

Published:

टेलिव्हिजनवरील कुमकुम भाग्य (Kumkum Bhagya) मालिकेतून प्रवास सुरू करून बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून नाव कमावलेली मृणाल ठाकूर (MrunalThakur) सध्या एका जुन्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu)च्या शरीरयष्टीवर टिप्पणी करताना दिसते.

व्हिडिओत, मृणालसोबत बसलेल्या व्यक्तीने बिपाशाचं कौतुक केल्यावर, मृणाल म्हणते, “मी बिपाशापेक्षा चांगली आहे. तुला अशा मुलीशी लग्न करायचंय का जी पुरुषी दिसते आणि ज्याचे मसल्स असतात? मग जा, बिपाशा बासूशी लग्न कर. मी तिच्यापेक्षा अनेक पटींनी चांगली आहे.” हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी मृणालवर टीका केली.

या प्रकरणावर बिपाशा बासूने थेट नाव न घेता इन्स्टाग्राम स्टोरीवर सशक्त महिलांबाबतची पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये ती म्हणते, “सशक्त महिला एकमेकींना वर नेतात. सुंदर महिलांनी त्यांचे स्नायू बळकट ठेवावेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ताकद गरजेची आहे. महिलांनी मजबूत दिसू नये हा जुना विचार मोडून काढण्याची वेळ आली आहे.”

कामाच्या आघाडीवर, मृणाल नुकतीच सन ऑफ सरदार 2 (Son Of Sardar) या चित्रपटात दिसली असून तिने रवी किशन (Ravi Kishan), नीरु बाजवा (Niru Bajva), चंकी पांडे (Chunkky Pandey), संजय मिश्रा (Sanjay Mishra) यांच्यासोबत भूमिका साकारली आहे. सीता रामम आणि नाना सारख्या चित्रपटांतून तिने दक्षिणेतही लोकप्रियता मिळवली आहे. तर बिपाशा बासूने आपल्या काळात बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले असून सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तिचं लग्न अभिनेता करण सिंह ग्रोवरसोबत झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img