एसीसीने 26 जुलै रोजी यूएईमध्ये (UAE) होणाऱ्या आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं असून, दोन स्टेडियममध्ये आठ संघांदरम्यान ही प्रतिष्ठित स्पर्धा रंगणार आहे. गतविजेता भारत आपला संघ कधी जाहीर करणार याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये वाढली आहे.
मात्र, भारतीय संघाचा माजी विकेटकीपर दीप दासगुप्ता (Deep Dasgupta) यांनी संजू सॅमसनच्या (Sanju Samsan) निवडीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांच्या मते, संजूला या स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही महिन्यांत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा संजू, मागील पाच सामन्यांत मात्र फक्त 51 धावांवर थांबला आहे.
दासगुप्ता यांच्या मते, शुबमन गिल (Shubhman Gill) यूएईतील संथ खेळपट्टीवर विराट कोहलीसारखी भूमिका बजावू शकतो, तर अभिषेक शर्मा (Abhishekh Sharma) ओपनर म्हणून एकहाती सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. यशस्वी जैस्वालला संधी मिळणं कठीण असून, निवड समितीला मधल्या फळीमध्ये संजू सॅमसन किंवा जितेश शर्मा यांच्यातून निवड करावी लागेल.