22.6 C
New York

Nawab Malik : मुंबई महापालिकेसाठी अजितदादांची मोर्चेबांधणी; अनुभवी नवाब मलिकांना मोठी जबाबदारी

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि नवाब मलिक यांच्यावर (Nawab Malik) आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने (Mumbai News) मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अशी माहिती दिली. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.

मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.

समीर भुजबळ यांनी राजीनामा दिल्यापासून मुंबईचे अध्यक्षपद रिक्तच आहे. राष्ट्रवादीने आताही अध्यक्ष न नेमता समिती नियुक्त केली आहे. यात नवाब मलिक यांना मोठी जबाबदारी दिली आहे. च स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकर होणार आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्वाची आहे.

मुंबईत महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाचा चांगला दबदबा आहे. त्यातुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी आहे. मुंबईत आपली ताकद वाढवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नवाब मलिक यांच्यावर निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. आता नवाब मलिक या पदाला कसा न्याय देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img