22.2 C
New York

Aditya Thackeray : बीडीडी चाळ चावी वाटप कार्यक्रमात यामुळे आदित्य ठाकरे गैरहजर

Published:

वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा ताबा आज (गुरुवार) घरमालकांना दिला गेला. या चावी वाटपाचा शानदार कार्यक्रम माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात झाला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी नाराजीनाट्य देखील रंगले. या कार्यक्रम पत्रिकेवर वरळीचे आमदार तथा शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे नाव आहे मात्र भाषण करणाऱ्यांच्या यादीत ठाकरेंचे नाव वगळल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील बीडीडी चाळ इमारतींच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित राहिले, अशी चर्चा आहे.

Aditya Thackeray भाषणाच्या यादीतून नाव वगळल्यामुळे…

वरळी येथील बीडी चाळींच्या इमारतींचा पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन झाले. दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून तब्बल 556 घरांचा ताबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडीडी रहिवाशांना चावी वाटप करुन देण्यात आला. ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळीचा पुनर्विकास म्हाडा मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या उपक्रमातील पहिल्या दोन इमारतींच्या चावी वाटपाचे सोहळा आज झाला. यामध्ये नाराजी नाट्य दिसून आले.

सत्ताधारी विविध कार्यक्रमांमध्ये विरोधकांना डावलतात असा आरोप शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने करत आले आहेत. आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीला या कार्यक्रमात भाषणाची संधी दिली जाणार नाही, अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचेच टाळले. मात्र त्यांच्या पक्षाचे विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर, आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

Aditya Thackeray आणखी एका आमदाराची नाराजी

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आणखी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या (ठाकरे) स्थानिक आमदारांना डावलण्यात आल्याची घटना घडलेली आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (ठाकरे) नेते वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघातील कलानगर पूल आणि एससीएलआर एक्सटेंशनचे उद्घाटन 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे. यावरुन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img