अनेकांना शॅम्पेन (Wine) आणि वाईनमध्ये (Champagne) गोंधळ होतो, पण तज्ज्ञ सांगतात की शॅम्पेन ही एक प्रकारची वाईन असली तरी प्रत्येक वाईन शॅम्पेन नसते. खरं तर, ‘शॅम्पेन’ हा दर्जा फक्त फ्रान्समधील शॅम्पेन शहरात तयार झालेल्या स्पार्कलिंग वाईनलाच मिळतो. त्या शहराबाहेर तयार झाल्यास त्याला केवळ स्पार्कलिंग वाईन म्हणतात.
दोन्ही पेय द्राक्षांपासून बनवली जातात, मात्र शॅम्पेनसाठी वापरली जाणारी चार्डोने, पिनोट नॉयर यांसारखी द्राक्षे खास त्या प्रदेशात पिकवली जातात. वाईन मात्र जगभरातील विविध द्राक्षांपासून तयार होते. बनवण्याची पद्धतही वेगळी असते—शॅम्पेन दोन टप्प्यात किण्वित होऊन कमीतकमी 15 महिने साठवली जाते, तर वाईनमध्ये यीस्ट आणि साखर मिसळून तीनदा साठवणूक केली जाते.
चवेतही फरक जाणवतो. शॅम्पेन तुलनेने ड्राय असते, तर स्पार्कलिंग वाईन अधिक गोडसर आणि फळांचा स्वाद असते. मात्र, कोणतेही अल्कोहोलिक पेय शरीरासाठी हानिकारक असते, हे विसरू नये.