15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश राज्यातील काही महानगरपालिकेकडून देण्यात आल्याने राज्यात राजकारण तापले आहे. या निर्णयाचा विरोध करत राज्य सरकारवर जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड कत्तलखाना बंदीवरून भडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Jitendra Awhad काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
कत्तलखाने बंदिचा 38 वर्षा पूर्वीचा आदेश हा कत्तलखाने बंद ठेवा असं आहे. विक्रीवर बंदी नव्हती. तसेच आता परिस्थिती बदललेली आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के वर्ग हा मांसाहारी आहे. तसेच 15 ऑगस्टल शुक्रवार आहे. त्या दिवशी मध्यम वर्गीय माणसं मांसाहार करतात. आपण सर्व मास भक्षण करणारी लोक आहोत. अचानक ब्राम्हणवाद आणून मांसाहार बंद केला जात आहे. पण बहुजनांच्या घरात सणवार हे मांसाहार करून साजरे केले जातात. सत्ताधारी पक्षातील एका नेत्याने देखील हे मान्य केलं आहे. ही बंदी म्हणजे केवळ द्वेष निर्माण केला जात आहे. अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.
Jitendra Awhad 15 ऑगस्टला मासांहार विक्री बंद ठेवणे अयोग्य – अजित पवार
अजित पवार या प्रकरणात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी टिव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा विषय असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशावेळी असा निर्णय घेतला जातो. आपण कोकणात गेलो तर प्रत्येक भाजीत सुकट टाकतात. त्यामुळे अशी बंदी घालणे योग्य नाही. महाराष्ट्रात 15 ऑगस्ट रोजी भावनिक मुद्दा असेत तर त्या काळासाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात पण अशी बंदी घालणे योग्य नाही. अजित पवार असं माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असेही माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.
Jitendra Awhad नेमकं प्रकरण काय?
मासविक्री दुकाने आणि कत्तखाने बंद महापालिकेच्या आदेशानुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.