26.7 C
New York

Rohit Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Published:

राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन वर्षांपूर्वी फूट पडली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या अनेक आमदारांनी पक्षाची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत गेले होते. यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही अनेक नेत्यांची साथ सोडली होती. दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षाची साथ सोडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवा बेरोजगारांचे प्रश्नांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मंडल यात्रा काढली जात आहे. भंडाऱ्यात ही यात्रा आली आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही भाजपाच्या आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे, जर अजित पवार यांनी भाजपाची साथ सोडली आणि शरद पवारांसोबत व त्यांच्या पुरोगामी विचारासोबत ते आले, तर आम्ही त्यांचा विचार करू. मात्र, अजित पवार भाजपासोबत असतील, तर आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे जर अजित पवार यांनी भाजपाला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं? यासंदर्भात विचार केला जाईल, असे सूचक वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का? हे पाहावे लागेल.

Rohit Pawar येत्या काळात यश नक्कीच येणार

रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रलोभन दिली होती. कर्जमाफी असो किंवा बोनस असो, शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. तर दुसरीकडे माझ्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली होती. मात्र, कारवाई झाली की, मराठी माणूस हा लढायला तयार होतो. त्यामुळे मी सुद्धा लढत आहे. परंतु काही कारवाईच्या धास्तीनं जिथे सत्ता आहे, तिथे जात आहेत. असे असले तरी , आमच्यासोबत जे आहेत ते संपूर्ण निष्ठावान आहेत. त्यामुळे येत्या काळात यश नक्कीच येणार, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img