अभिनेत्री दिशा पटानीची (Disha Patani) बहीण आणि माजी लष्करी अधिकारी खुशबू पटानी (Khushboo Patani) पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी एका अथान मुलीला तिच्या आईकडे पोहोचवून त्यांनी कौतुक मिळवलं होतं. मात्र यानंतर कथावाचक अनिरुद्धाचार्यांच्या महिलांविषयीच्या वादग्रस्त विधानावर टीका करताना खुशबूंनी मुलींची बाजू घेतली, ज्यावर काहींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
आता खुशबू पटानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून श्रीकृष्णांच्या प्रेम आणि विवाहाविषयी वक्तव्य केले आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, “श्रीकृष्णांनी रुक्मिणीला द्वारकेला पळवून नेलं, जे समाजाच्या विरोधात वाटेल, पण त्यांनी समाजातील अनेक आदर्श मोडले.” या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे.
काही नेटकर्यांनी त्यांच्या वक्तव्याला “विनाशकाले विपरीत बुद्धी” म्हणत विरोध केला तर काहींनी श्रीकृष्णांनी धर्म आणि शिष्टाचाराचे रक्षण केल्याचं सांगितलं. याआधीही अनिरुद्धाचार्यांच्या “25 वर्षांच्या मुली आधीच अनेक ठिकाणी तोंड मारून आलेल्या असतात” या वक्तव्यावर खुशबूंनी जोरदार प्रतिक्रिया दिली होती आणि फक्त मुलींनाच दोष देण्याची प्रवृत्ती प्रश्नांकित केली होती. खुशबू पटानी यांची वक्तव्यं नेहमीच चर्चेचं आणि वादाचं केंद्रबिंदू ठरत आहेत.