24.8 C
New York

Hair Care : कोंड्याची समस्या टाळण्यासाठी करा या छोट्या सवयींमध्ये बदल

Published:

लांब, घनदाट आणि चमकदार केस हे अनेकांचं स्वप्न असतं, पण या केसांची योग्य काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त शँपू लावून केस धुणं पुरेसं नसतं केसांना पोषणाचीही गरज असते. आजच्या व्यस्त जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेतली जात नाही. पावसाळ्यात हवा खुप जास्त असते त्यामुळे पावसात हवेतील ओलाव्यामुळे केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. उदाहरणार्थ. कोंडा होणे,(Dandruff) केस गळणे, (Hair Fall) केस चिकट होणे, (Sticky Hair) टाळूवर इन्फेक्शन होणे (Scalp Infection) या सगळ्या गोष्टींसाठी बळी पडावं लागत, त्यामुळे केसांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.यामुळे टाळूवर

कोंड्याची समस्या वाढते. कोरडी किंवा तेलकट त्वचा, बुरशीजन्य संसर्ग, हार्मोनल बदल, तसेच काही चुकीच्या सवयींमुळे कोंडा होऊ शकतो. केस कमी धुणे, घटक न समजणारी उत्पादने वापरणे, ओले केस बांधणे, जास्त तेल लावणे किंवा पाणी कमी पिणे — हे सगळे कोंड्याचे कारण ठरू शकते. कोंडा टाळण्यासाठी केस स्वच्छ व कोरडे ठेवणे, योग्य उत्पादने वापरणे, संतुलित आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. घरगुती उपायांमध्ये दह्यात लिंबू मिसळून लावणे उपयुक्त ठरते, तर गंभीर परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला व अँटी-फंगल शॅम्पू वापरणे फायदेशीर ठरू शकते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img