काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून मत चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार हल्लाबोल करत आहे. राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. तर आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी या व्हिडिओ ला ‘आयुष्यात अनेक मनोरंजक अनुभव आले आहेत, परंतु मृतांसोबत चहा पिण्याची संधी कधीच मिळाली नाही. या अनोख्या अनुभवाबद्दल निवडणूक आयोगाचे आभार.’ असं कॅप्शन दिले आहे.
एक्स वर राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काही लोकांसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्यो राहुल गांधी म्हणत आहे की, मी ऐकले की तुम्ही जिवंत नाही, याबाबात तुम्हाला कधी माहिती मिळाली? राहुल गांधी यांच्या प्रश्नावर एक व्यक्ती म्हणतो की, आम्हाला जिवंत लोकांनी मारले. जेव्हा आम्ही मतदार यादी तपासली तेव्हा आम्ही मृत असल्याचे कळले. यावर राहुल गांधी म्हणातात की, तुम्हाला निवडणूक आयोगाने मारले आहे. तुमच्यासोबत या देशातील किती लोकांना निवडणूक आयोगाने मृत घोषित केले आहे.
पुढे राहुल गांधी म्हणतात की, तुम्हाला काय वाटतो तुम्ही किती मतदान केंद्रांवर आहात? याला उत्तर देताना ते म्हणतात की एका पंचायतीत असे किमान 50 लोक असतील. आम्ही 3 ते 4 मतदान केंद्रांवर आहोत. बरेच लोक अजून इथे पोहोचलेले नाहीत. तेजस्वी जी यांच्या विधानसभा राघोपूर मतदारसंघातून या लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. ही महिला आज 6 तासांपासून सर्वोच्च न्यायालयात उभी आहे. तीच मागणी आहे की बिहारमध्ये ज्या 65 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांची माहिती द्यावी. आम्ही म्हणत आहोत की स्थलांतरित झालेले ते 36 लाख लोक कोण आहेत.
यानंतर राहुल गांधी म्हणाले की निवडणूक आयोग हा डेटा देऊ इच्छित नाही. कारण जर त्यांनी डेटा दिला तर त्यांचा हा संपूर्ण खेळ संपेल. असं राहुल गांधी म्हणाले.