गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) आणि रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पाहायला मिळत आहे. यातच राज्य सरकारने स्वातंत्र्य दिनाला (Independence Day Flag Hoisting) महायुतीमध्ये कोण कुठे ध्वाजारोहण करणार याची यादी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा सुरु असणारा वाद समोर आला आहे. नाशिकमध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गिरिष महाजन (Girish Mahajan) ध्वाजारोहण करणार आहे तर 15 ऑगस्टच्या दिवशी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) गोंदियामध्येध्वाजारोहण करणार आहे मात्र छगन भुजबळ यांनी आता ध्वाजारोहण करण्यासाठी नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
तिन्ही पक्ष नाशिकमध्ये 2027 मध्येकुंभमेळा (Kumbh Mela) होत असल्याने नाशिक पालकमंत्रिपदासाठी दावा करत आहे. गिरीश महाजन यांना राज्य सरकारकडून नाशिकमध्ये ध्वाजारोहण करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने शिवसेना नेते दादा भुसे (Dada Bhuse) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नाशिक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वाजारोहण करण्याची संधी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याने त्यांनी गोंदियामध्ये ध्वाजारोहण करण्यास नकार दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी ध्वाजारोहण करण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिक पालकमंत्री पदासाठी शिवसेनेकडून मागणी होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी करत आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नसल्याची देखील माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी गोंदियामध्ये ध्वाजारोहण करण्यास नकार दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्ट रोजी गोंदिया येथे ध्वाजारोहण करण्याची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.