24.8 C
New York

Ayush Mhatre : इंग्लंडमधील चमकदार कामगिरीनंतर आयुष म्हात्रेवर मुंबईचं नेतृत्व सोपवलं!

Published:

इंग्लंड दौऱ्यात अंडर-19 भारतीय संघाला मालिका विजय मिळवून देणारा मराठमोळा आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आता मुंबई संघाचं नेतृत्व करणार आहे. एमसीए निवड समितीने संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुची बाबू 2025-26 स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली असून, सुवेद पारकरला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या संघात कसोटी क्रिकेट खेळलेला सर्फराज खान (Sarfraj Khan), मुशीर खान (Mushir Khan) आणि हार्दिक तामोरे (Hardik Tamore) यांचाही समावेश आहे. स्पर्धा 18 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत होणार असून, मुंबईचा पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी तामिळनाडू डिस्ट्रिक्ट इलेव्हनविरुद्ध होईल.

आयुषने आतापर्यंत 9 फर्स्ट क्लास सामन्यांत 504 धावा (2 शतकं, 1 अर्धशतक) केल्या आहेत. दरम्यान, 17 किलो वजन कमी केल्यानंतर सर्फराज खानची कामगिरीही या स्पर्धेत चर्चेचा विषय ठरणार आहे. बुची बाबूनंतर सर्फराज दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोनकडून खेळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img