इंग्लंड (England) दौऱ्यात टी20 आणि वनडे दोन्ही मालिका जिंकून विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या भारतीय महिला संघानंतर, राधा यादवच्या नेतृत्वाखालील वूमन्स इंडिया (Womens India) ए टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली. मात्र, येथे टी20 मालिकेत त्यांना 0-3 असा क्लिन स्वीपचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही सुरुवात निराशाजनक झाली. 7 ऑगस्टला पहिल्या सामन्यात 13 धावांनी पराभव, 9 ऑगस्टला दुसऱ्या सामन्यात तब्बल 114 धावांनी हार, आणि 10 ऑगस्टला तिसऱ्या सामन्यात केवळ 4 धावांनी पराभव, अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 ने वर्चस्व राखलं.
आता 13 ते 17 ऑगस्टदरम्यान नॉर्थ्स (Norths) येथे आणखी एक 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेत भारतीय महिला ब्रिगेडला पुनरागमन करण्याची आणि ऑस्ट्रेलियावर प्रत्युत्तर देण्याची सुवर्णसंधी आहे. संघात राधा यादव (Radha Yadav) (कर्णधार), मिन्नू मणी (Minnu Mani) (उपकर्णधार), शफाली वर्मा (Shafali Verma), तेजल हसबनीस (Tejal Hasbanis), रघवी बिस्त, तनुश्री सरकार, उमा चेत्री (विकेटकीपर), प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), धारा गुज्जर, जोशिता व्हीजे, शबमन शकील, साईमा ठाकोर आणि तितास साधु यांचा समावेश आहे.