32.2 C
New York

Tridev : ‘त्रिदेव’च्या ‘ओए ओए’ गाण्यामुळे देशभरात अटकेची प्रकरणे? राजीव राय यांचा खुलासा

Published:

बॉलिवूड चित्रपट आणि त्यातील गाणी यांचे नाते अतूट आहे. अनेकदा एखाद्या चित्रपटाच्या यशात गाण्यांचा मोठा वाटा असतो. 1989 मधील ब्लॉकबस्टर त्रिदेव (Tridev) यातील ‘ओए ओए’ (Oye Oye)हे गाणं त्याचं उदाहरण आहे. ते रेडिओवर गाजलं, चार्टबस्टरच्या पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आणि लोकांच्या तोंडपाठ झालं. पण या लोकप्रियतेसोबतच या गाण्यामुळे एक अनपेक्षित वाद निर्माण झाला होता.

दिग्दर्शक राजीव राय (RajivRay) यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘ओए ओए’वर बंदी आली नव्हती, परंतु देशभरातील अनेकांनी हे गाणं छेडछाडीचं साधन म्हणून वापरायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या तक्रारींवरून अनेकांना अटकदेखील झाली. मात्र, वाद असूनही हे गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं नाही.

हे गाणं ग्लोरिया एस्टेफनच्या Rhythm Is Gonna Get You या गाजलेल्या गाण्यापासून प्रेरित होतं. कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कविता कृष्णमूर्ती व सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गाणं आजही जुन्या हिट्समध्ये गणलं जातं.

त्रिदेव हा सनी देओल (Sunny Deol), जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah), सोनम (Sonam), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), संगीत बिजलानी (Sangit Bijlani), अनुपम खेर (Anupam Kher) आणि अमरीश पुरी (Amrish Puri) यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या भूमिका असलेला अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. प्रदर्शनाानंतर हा त्या वर्षीचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. तसेच, 1990 च्या 35 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तीन पुरस्कार पटकावले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img