32.2 C
New York

Health Tips : पावसाळ्यात अदरक मधाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढवा

Published:

सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्दी, खोकला, पचनाचे विकार अशा हंगामी तक्रारींचा धोका वाढतो. अशा वेळी आहारात काही नैसर्गिक व औषधी गुणधर्म असलेले पदार्थ समाविष्ट करणे गरजेचे आहे. अदरक आणि मध ही अशीच एक जोडी आहे जी प्राचीन काळापासून आयुर्वेदात औषध म्हणून वापरली जाते.

आल्यामधील जिंजरॉल आणि मधातील अँटीऑक्सिडंट्स हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात व संसर्गांपासून संरक्षण करतात. हे मिश्रण घेतल्याने पचन सुधारते, बद्धकोष्ठता व पोटफुगी कमी होते. तसेच सर्दी-खोकल्यामध्ये अदरकाचा रस व मध एकत्र घेतल्यास घशातील जळजळ कमी होते व श्वसनाला आराम मिळतो. दम्याच्या रुग्णांनाही याचा फायदा होऊ शकतो, कारण हे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते व संसर्गाचा धोका कमी करते.

वजन नियंत्रणासाठीही अदरक-मध उपयुक्त ठरते, कारण यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. सेवनासाठी आल्याचा ताजा रस व त्यात मध मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घेणे लाभदायी आहे. मात्र, कोणताही आजार असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img