16.8 C
New York

Jalgaon : सरपंचाकडून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ, नेमकं काय आहे प्रकरण ?

Published:

शेळावे ता पारोळा जिल्हा जळगाव (Jalgaon) येथील आदिवासी समाजाच्या महिलेला तीन चार दिवसांपूर्वी शेळावे ग्रामपंचायत येथे मासिक बैठक होती या बैठकीत आदिवासी महिलेने सरपंच यांना कामकाजा बाबत जाब विचारला म्हणून सरपंच यांनी आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती पिडीत आदिवासी महिलेच्या कुटुंबांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटक तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके यांच्या बरोबर संपर्क केला व पारोळा पोलिस स्टेशनचे अधिकारी गुन्हा दाखल करत नाही म्हणून सांगीतले त्यामुळे मुकेश भाऊ साळुंके यांनी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक साहेबयांच्या संपर्क साधला व साहेबांना झालेल्या घटनेची माहिती दिली व साहेबांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यास सांगितले व दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस निरीक्षक यांनी शेळावे येथील आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा केला व आरोपींवर कठोरात कठोर होईल असे आश्वासन दिले यावेळी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश भाऊ साळुंके, राज्य महासचिव श्री दिपकभाऊ खांदे (सुर्यवंशी), राज्य सचिव श्री अमोल भाऊ सुर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण सर, महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री दिनेश भाऊ चव्हाण, जगदीश भाऊ चव्हाण, आनंद चव्हाण इत्यादी पदाधिकारी यांनी शेळावे येथील आदिवासी समाजाची भेट घेऊन त्यांना सर्व सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img