15.9 C
New York

Sharad Pawar : “मतचोरीच्या आरोपावर आयोगाने उत्तर द्यावं, शरद पवारांची राहुल गांधींना भक्कम साथ

Published:

सध्या मतचोरीचा मु्द्दा उपस्थित करुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) घाम फोडला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्याकडून मतचोरी होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले. तसेच भाजप नेत्यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता राहुल गांधींना विरोधी पक्षांची या वादात साथ मिळत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल गांधींना भक्कम साथ दिली आहे. नागपूर दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाने उत्तरं द्यायला हवीत भाजपने नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलाय. आयोगावर त्यांनी आरोप केले आहेत. पण यावर उत्तर देण्यासाठी भाजप किंवा मुख्यमंत्री पुढे येतात. याचं कारण काही मला समजू शकलेलं नाही. आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तर पाहिजे. भाजपकडून नाही. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगानेच उत्तर द्यायला हवं. उत्तर देण्याऐवजी त्यांच्याकडून शपथपत्र मागितलं जात आहे जे अत्यंत चुकीचं आहे असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar राहुल गांधींचा आरोप काय?

भाजप आणि निवडणूक आयोगाने विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत मत चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. याच मुद्द्यावर देशात चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीने (INDIA Alliance) याच मुद्द्यावर येत्या 11 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

Sharad Pawar राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर काय?

राहुल गांधी यांनी गुरुवारी (दि.7) घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर पत्ते, ओळखपत्रे, इलेक्ट्रॉनिक डेटा न देणे, मतदार यादीतील अनियमितता, मतदानाच्या टक्केवारीत अचानक वाढ, भाजपला मदत करणे आणि संविधानाचे उल्लंघन असे गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची त्यावर आयोगाने पटकथा जुनी आहे. पुन्हा पुन्हा एक गोष्ट केली जात असून हा प्रकार म्हणजे जुन्या बाटलीत नवीन दारूसारखे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img