बॉलिवूडमधील ग्लॅमरस कपल्सच्या घरी सध्या नवे पाहुणे येत आहेत आणि त्यात आता कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या नावाचाही समावेश होताना दिसतो आहे. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून, यात दावा केला जात आहे की कतरिना-विकीकडे लवकरच बाळ येणार आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे – “2025 मध्ये आम्ही तिघांचे कुटुंब होणार आहोत.” या मजकुरामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
व्हायरल पोस्टनुसार, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये ‘बेबी कौशल’ किंवा ‘बेबी कतरिना’चं आगमन होणार आहे. यामुळे अनेकांनी दोघांना सोशल मीडियावर (Social media) अभिनंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाचा विकीसोबत अलिबागला जातानाचा एक व्हिडिओही चर्चेत आला होता, ज्यामध्ये तिने ओव्हरसाइज शर्ट घातला होता. आणि त्यावरूनही अनेकांनी ती गर्भवती असल्याचा अंदाज लावला होता.
तथापि, कतरिना किंवा विकी यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरदेखील यासंदर्भात कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. या चर्चांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असली, तरी दोघेही कायम आपल्या खासगी आयुष्याबाबत गुप्तता बाळगतात.
या सर्व चर्चांमध्ये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी – अशी वैयक्तिक माहिती शेअर करायची की नाही, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार संबंधित व्यक्तींचाच असतो. तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी संयम आणि आदराने वाट पाहणं हेच योग्य ठरेल.