16.5 C
New York

Jasprit Bumrah : बुमराह टीम इंडियासाठी ‘अनलकी’? आकडेवारीतून नव्या चर्चाना उधाण

Published:

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघात अनेक ऐतिहासिक घडामोडी पाहायला मिळाल्या. मैदानावर तगडी फलंदाजी, धारदार फिल्डिंग आणि यशस्वी नेतृत्व या गोष्टींच्या जोरावर भारताने जागतिक क्रिकेटमध्ये आपली छाप उमठवली. पण तरीही एक कमतरता होती. एक असा वेगवान गोलंदाज, जो निर्णायक क्षणी सामन्याचं पारडं फिरवू शकेल. हीच उणीव भरून काढली जसप्रीत बुमराहने(Jasprit Bumrah), ज्याला आज ‘यॉर्कर किंग (Yorker King) म्हणून ओळखलं जातं.

बुमराहने भारताला अनेकवेळा अशक्य वाटणाऱ्या सामन्यात विजय मिळवून दिला आहे. त्याची अचूक आणि आक्रमक गोलंदाजी अजूनही संघासाठी महत्वाची आहे. पण अलीकडच्या काळात बुमराहवर टीका होऊ लागली आहे. कारण, आकडेवारी सांगते की बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना भारताला अपेक्षेपेक्षा जास्त पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बुमराहसोबत आणि त्याच्याशिवाय टीम इंडियाची कामगिरी

बुमराहने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर भारताने एकूण 76 कसोटी सामने खेळले. यापैकी 48 सामन्यांत बुमराह होता, त्यात भारताने फक्त 20 सामने जिंकले, तर 24 वेळा पराभव पत्करावा लागला. उरलेल्या 28 सामन्यांत बुमराह नव्हता, आणि त्यात भारताने तब्बल 20 विजय मिळवले, फक्त 5 वेळा पराभव झाला आणि 3 सामने अनिर्णित राहिले.
हे आकडे पाहून अनेकांना प्रश्न पडतो. बुमराह संघात असताना भारत जास्त हरतो का? आणि त्याचबरोबर बुमराहवर संघाची जास्त अवलंबन आहे का?

वर्कलोड की समर्पणाचा अभाव?

इंग्लंड दौऱ्यात बुमराहवर टीकेची झोड उठली. माजी गोलंदाज इरफान पठाणसह (Irfan Pathan) अनेकांनी हे सांगितलं की बुमराहने आवश्यक असताना दीर्घ स्पेल टाकले नाहीत. इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स दुखापत असूनही जास्त ओव्हर्स टाकतो, मग बुमराह का नाही? चाहत्यांचा आक्षेप अगदी स्पष्ट होता.
यात अधिकच भर पडली, जेव्हा बुमराहने फक्त 3 कसोट्यांसाठी उपलब्ध असल्याचं आधीच सांगितलं होतं. याउलट, सिराज, राहुल, गिल, जैस्वाल हे खेळाडू सर्व 5 सामने खेळले. त्यामुळे बुमराहच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक होतं.

बुमराहची कामगिरी आणि टीका

इंग्लंडविरुद्धच्या (England) तीन कसोट्यांत बुमराहने 14 बळी घेतले, दोन वेळा 5 विकेट्सही घेतल्या. इकॉनॉमीही चांगली होती – फक्त 3.04. म्हणजेच त्याने आपली जबाबदारी नीट पार पाडली. तरीसुद्धा, टीका कायम राहिली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता BCCI आणि टीम मॅनेजमेंटने खेळाडूंना प्रत्येक सामन्यात खेळणं आवश्यक केलं आहे. त्यामुळे बुमराहने आपल्याच मर्जीनुसार सामने खेळल्याचा चुकीचा अर्थ लावला जातोय का? हाही प्रश्न उपस्थित होतो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img