16.5 C
New York

IND vs ENG : सिराजचा दमदार पराक्रम ५ कसोटीत ३१ किमीपेक्षा अधिक धावा?

Published:

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत संपवली आणि त्यात शुबमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली संघाने जबरदस्त कामगिरी केली. या यशामागे संपूर्ण संघाचा हात आहे, पण विशेषतः वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad siraj) जबरदस्त योगदान दिलं.

बुमराहच्या (Bumrah) अनुपस्थितीत भारताने निर्णायक पाचवा सामना जिंकला आणि त्यामध्ये सिराजने आपली ताकद दाखवून दिली. सिराजने मालिकेतील सर्व पाच सामन्यांमध्ये भाग घेतला आणि एकूण 185.3 षटके म्हणजे तब्बल 1113 चेंडू टाकले. प्रत्येक चेंडूसाठी सरासरी 14 मीटरच्या रनअपने 28 मीटर धावत तो चेंडू टाकतो, म्हणजेच या मालिकेत त्याने अंदाजे 31 किलोमीटरपेक्षा जास्त धाव घेतली.

हे केवळ त्याचं गोलंदाजीचं काम नव्हतं. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना देखील त्याने आपल्या भूमिकेचं चोख पालन केलं. संपूर्ण मालिकेत तो भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. 23 बळी घेऊन त्याने आपली जागा भक्कम केली.

आशिया कप 2025 (Asia Cup) मध्ये त्याचा समावेश होईल का, हे अजून स्पष्ट नाही. पण वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळणं निश्चित वाटतंय. कारण कसोटी क्रिकेटमध्ये सध्या सिराजची धार टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img