16.3 C
New York

Rohit Pawar : “गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच पडळकर सोलापुरात,”, अपहरण प्रकरणी रोहित पवारांचं प्रत्युत्तर

Published:

आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या (Gopichand Padalkar) कार्यकर्त्याचं अपहरणाचं प्रकरण चांगलंच तापू लागलं आहे. पडळकर यांच्या शरणू हांडे या कार्यकर्त्याचं अपहरण करन त्याला मारहाण करण्यात आली. त्याची हत्या करण्याचाही प्रयत्न होता. या कार्यकर्त्यानं यामागे मास्टरमाइंड म्हणून आमदार रोहित पवार यांचं (Rohit Pawar) नाव घेतलं. अपहरण करून नेलेल्या आरोपींना रोहित पवारांचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांनी मला माफी मागायला सांगितलं असा दावा या कार्यकर्त्याने केला होता. या सर्व घडामोडींवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. व्हिडिओ कॉलवर मी माझ्या घरच्यांशी सुद्धा बोलत नाही तर हा कोण लागून गेला आहे, असे उत्तर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी दिले.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाले होते. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या समर्थकाचे नाव समोर आले होते. अपहरण करुन हत्येचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्याच्या उद्देशाने केल्याची माहिती समोर आली. या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिसांनी शोध सुरू केला. त्यामुळे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. शरणू हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर आज सकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरणू हांडे या कार्यकर्त्याची रुग्णालयात भेट घेतली. त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. या सगळ्या प्रकरणामागे रोहित पवार हेच मास्टरमाइंड आहेत असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

Rohit Pawar मला अडकवण्याचा प्रयत्न : रोहित पवार

आरोप तर ते करणारच. सरकारच्या विरोधात मी मोठ्या प्रमाणात बोलत आहे त्यामुळे सरकारची अडचण होत आहे. मी ती केलेली आहे. काल मी फोन केला असं सांगितलं जात आहे. पण मी तर काल छत्रपती संभाजीनगरला होतो. त्यानंतर वाशिममध्ये होतो. आज अमरावतीत आहे. अजून तरी मी कुणाशीही बोललेलो नाही. व्हिडिओ कॉल करुन मी त्या कार्यकर्त्याला बोललो असं सांगितलं जात आहे. मी माझ्या घरच्यांशी सुद्धा व्हिडिओ कॉलवर कधी बोलत नाही मग हा कोण लागून गेला याच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलायला असा सवाल रोहित पवार यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img