16.6 C
New York

Nissan Magnite Kuro : ब्लॅक ब्युटी ‘निसान मॅग्नाइट कुरो एडिशन’ आता 10 लाखांखाली स्टायलिश लुक, जबरदस्त फीचर्स आणि 5 स्टार सेफ्टी?

Published:

भारतीय ग्राहकांसाठी स्वस्त आणि स्टायलिश SUV शोधणाऱ्यांसाठी निसानने एक आकर्षक पर्याय बाजारात आणला आहे. नवीन निसान मॅग्नाइट कुरो (Nissan Magnite Kuro) स्पेशल एडिशन आता लॉन्च करण्यात आला असून, याची सुरुवातीची किंमत फक्त ₹8.30 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. ही खास आवृत्ती ऑल-ब्लॅक डिझाइन (ALL Black Design), प्रीमियम इंटीरिअर आणि आधुनिक फीचर्सनी सजलेली आहे.

डिझाईन आणि लुक्स:

ही एडिशन ‘कुरो’ म्हणजेच ‘ब्लॅक’ या थीमवर आधारित असून यात पियानो ब्लॅक ग्रिल, डायमंड कट R16 अलॉय व्हील्स, ग्लॉसी रूफ रेल्स, आणि कुरो बॅजिंगसह जबरदस्त रोड प्रेझेन्स देण्यात आला आहे. एलईडी हेडलॅम्प्स व टर्न इंडिकेटर्समुळे रात्रीसुद्धा स्टायलिश लुक कायम राहतो.

इंटीरिअर आणि फीचर्स:

कारच्या आतील बाजूला डार्क मिडनाइट थीम, पियानो ब्लॅक फिनिश, आणि गिअर शिफ्ट गार्निश दिले गेले आहे. यासोबत वायरलेस चार्जर आणि डॅशकॅमसारख्या अ‍ॅक्सेसरीजही मिळतात.

इंजिन आणि ट्रान्समिशन:

ही एसयूव्ही टर्बो पेट्रोल आणि नॅचरली एस्पिरेटेड इंजिन पर्यायांत उपलब्ध आहे, सोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही दिला गेलाय.

सुरक्षेची हमी:

क्रॅश टेस्टमध्ये ग्लोबल NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळवलेली ही SUV, 40 हून अधिक सेफ्टी फीचर्ससह सुसज्ज आहे – ज्यात ABS, EBD, 6 एअरबॅग्स, ESC, TCS, आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग यांचा समावेश आहे.

कंपनीचं म्हणणं:

निसान इंडिया चे MD सौरव वत्स यांनी सांगितले की, “कुरो एडिशनची वाढती लोकप्रियता पाहता, ग्राहकांसाठी ही खास स्पेशल एडिशन आणली असून ती नक्कीच भारतीय बाजारात यश मिळवेल.”

जर तुम्ही 10 लाखांखाली एक आकर्षक, सुरक्षित आणि फिचर-पॅक्ड SUV शोधत असाल, तर निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल एडिशन एक योग्य पर्याय ठरू शकतो. स्टाइल आणि सेफ्टी यांचा उत्तम मेळ हवी असलेल्यांसाठी ही SUV खास आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img