दिल्लीतील (Delhi) निजामुद्दीन (Nizamuddi) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या (Huma Qureshi’s) चुलत भावाचा पार्किंगच्या वादातून खून करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, वादाचा केंद्रबिंदू होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ कुरेशी (Asif Qureshi) हे ऑफिसहून घरी परतले असताना त्यांना घरासमोर शेजाऱ्यांची स्कूटी लावलेली दिसली. त्यांनी ती काढून दुसरीकडे लावण्याची विनंती केली. पण शेजाऱ्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर हाणामारी झाली. या झटापटीत आसिफ गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही आरोपींना अटक केली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. हुमा कुरेशीच्या वहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीही काही किरकोळ वाद झाले होते, मात्र यावेळी वाद इतका टोकाला गेला की प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना दिल्लीच्या हृदयात घडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे आणि पार्किंगच्या वादातून किती टोकाची हिंसा होऊ शकते याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.