कॉंग्रेसचे खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन मुख्यालयात पत्रकार परिषद घेत निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचे सांगत अनेक सवाल केले आहेत. “भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मते चोरली आहेत. या मतांच्या चोरीसाठी आम्ही एक टीम तयार केली होती. यामार्फत आम्ही काही माहिती गोळा केली,” असे म्हणत त्यांनी पोलखोल केली. तसेच, निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा का दिला नाही? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, “भाजप निवडणुकीत हेराफेरी करत आहे. बिहारमध्ये मतदार यादीतून नावे गायब झाली आहेत. आता निवडणूक आयोगाने ही यादी बरोबर आहे की चूक याचे उत्तर द्यावे. आता मतदान बराच काळ चालते. लोकसभा निवडणुकीत आपण ते पाहिले. माझा प्रश्न असा आहे की मतदान एकाच दिवसात का संपत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागतो. ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु भाजपला कधीही त्याचा सामना करावा लागला नाही.”
Rahul Gandhi राहुल गांधींचे हे आरोप
पत्रकार परिषदेत कॉंग्रेस खासदार राहुल गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी शेअर करण्यास नकार दिला. सीसीटीव्ही फुटेज कोणालाही दिले जाणार नाही यासाठी नियम बदलले. निवडणूक आयोग काय लपवत आहे? कोणताही रेकॉर्ड काढून टाकू नये.” असे आरोप केले आहेत.