बॉलीवूडचा दमदार अभिनेता सनी देओल (Sunny Deol) हा केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर राजकारणातही सक्रिय होता हे अनेकांना माहिती नसेल. ‘गदर 2’ (Gaddar 2) आणि अलीकडचा ‘जात’ यांसारख्या यशस्वी सिनेमांनंतर त्याच्या कमाईत भर पडली असली, तरी तो सरकारकडून देखील नियमित पेन्शन आणि सुविधा मिळवणाऱ्या माजी खासदारांपैकी एक आहे.
माजी खासदार म्हणून सनी देओलला मिळतात खास फायदे
सनी देओलने 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 ते 2024 या कालावधीत त्याने खासदार म्हणून काम पाहिलं. कार्यकाळ संपल्यानंतरही, सरकारकडून माजी खासदारांना मिळणाऱ्या काही निवडक सुविधांचा तो लाभ घेत आहे.
दरमहा पेन्शन
सध्या भारत सरकार माजी खासदारांना दरमहा ₹31,000 पेन्शन देते. सनी देओललाही ही रक्कम नियमित मिळते. पूर्वी ही रक्कम ₹25,000 होती, पण यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
मोफत रेल्वे प्रवास आणि इतर सुविधा
पेन्शन व्यतिरिक्त सनी देओलला काही खास व्हीआयपी फायदे मिळतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजीवन रेल्वे पास, ज्यामुळे तो आणि त्याचा एक सहप्रवासी फर्स्ट क्लास एसी किंवा एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये मोफत प्रवास करू शकतात.
सरकारी लेटरहेड आणि मोफत पोस्टल सेवा
दिल्लीतील सरकारी अतिथीगृहात सवलतीच्या दरात राहण्याची सोय
पूर्वी मिळणारी फोन बिल सवलत आता मर्यादित करण्यात आली आहे
सनी देओलचे आगामी सिनेमे
राजकारणातून काहीसं दूर गेलेला सनी देओल आता पुन्हा पूर्णपणे चित्रपटांकडे वळलेला दिसतो. त्याचे आगामी प्रोजेक्ट्स म्हणजे:
बॉर्डर 2
लाहोर 1947
रामायण भाग 1 आणि भाग 2