चैतन्य विद्यालय ओतूर (otur) येथील विद्यार्थ्यांनी सीमेवर तैनात भारतीय जवानांसाठी (Indian Army) एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशरक्षणासाठी जीव झोकून देणाऱ्या सैनिकांसाठी “एक राखी जवानांसाठी” राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या असल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालय ओतूर ( ता.जुन्नर ) मध्ये “एक राखी जवानांसाठी’ राखी बनविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून,सिमेवरील जवानांप्रती आपले बहिण-भावाचे बंध दृढ करण्यासाठी राख्या तयार केल्या.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या कमाण्डेन्ट -१७६ बटालियन, के रि पु बल ,बीएन सी.आर .पी. एफ ,वरीपोरा, जिल्हा बरामुल्ला ( जम्मु व कश्मीर ) सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. दरवर्षी हा उपक्रम विद्यालयात राबविला जातो
या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना ग्रामविकास मंडळ ओतूरचे सहसचिव पंकज घोलप म्हणाले की ,आपले सैनिक आपले प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करतात. आपल्या सैनिकांमुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. प्रत्येक सण व उत्सव आपण आनंदाने साजरे करतो. आपल्या जवानांना कुटुंबापासून दुर राहवे लागते. त्यांना सण व उत्सवामध्ये सहभागी होता येत नाही. रक्षाबंधन हा सण भावा व बहिणीचे अतूट नाते सांगणारा सण आहे.सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी राख्या तयार करून त्यांना पाठविल्या त्याबद्दल,सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन.नक्कीच सीमेवरील सैनिकांना राख्या मिळाल्यानंतर आनंद होईल.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष सोनवणे व बाळासाहेब साबळे (Balashaheb Sable) यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्राम विकास मंडळ ओतूरचे सचिव प्रदीप गाढवे , मुख्याध्यापिका राजश्री भालेकर , संजय हिरे ,अनिल उकिरडे ,शिक्षक प्रतिनिधी अजित डांगे ,भाऊसाहेब खाडे, राजाराम शिंदे ,संतोष कांबळे , मिलिंद खेत्री,भगवंता घोडे ,विशाल चौधरी,मंगेश तांबे,लक्ष्मण दुडे,विजया गडगे ,सोनाली माळवे,शिल्पा भालेराव,आशा गाडेकर,सोनाली कांबळे,वनिता भोर,आसावरी गायकर ,निर्मला डोंगरे,अमित झरेकर,देवचंद नेहे ,अनिल जवरे, दिनेश ताठे, रंजिता पाटील , सरस्वती भताने,रसिका शेळके, आशा डुंबरे,साक्षी देशमुख, आश्विनी नलावडे,अनुराधा इसकांडे ,संस्कृती डुंबरे, हर्षल शितोळ ,विजय खरात,योगेश फापाळे ,ईश्वर ढमाले,प्रसन्न तांबे,मयूर जाधव,अरविंद आंबरे उपस्थित होते.