छोट्या पडद्यावर अनेक मालिका येतात आणि जातात, पण काही मालिका प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करतात. अशीच एक मालिका म्हणजे ‘कुमकुम भाग्य (Kumkum Bhagya)’, जी तब्बल 11 वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. मात्र आता या लोकप्रिय मालिकेचा प्रवास थांबणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
टीआरपीत घट, प्रेक्षकांचा रस उडाल्याची लक्षणं
गेल्या काही महिन्यांपासून मालिकेच्या टीआरपीत सतत घसरण पाहायला मिळतेय. मालिकेतील चौथ्या पिढीचा ट्रॅक प्रेक्षकांना फारसा रुचला नसल्याचं चित्र स्पष्ट होतंय. सध्या प्रणाली राठोड (Pranali Rathod), अक्षय बिंद्रा (Akshay Bindra) आणि नमिक पॉल मुख्य भूमिकांमध्ये आहेत, पण त्यांच्या कथानकाने जुना जादू निर्माण करू शकलेला नाही.
श्रुती झा आणि शब्बीर आहलुवालिया यांचं सुवर्णयुग
‘कुमकुम भाग्य’ची (Kumkum Bhagya) सुरुवात 2014 मध्ये झाली होती. अभिनेत्री श्रुती झा (Shruti Jha) (प्रज्ञा) आणि शब्बीर आहलुवालिया (अभी) (Shabbir Ahluwalia) यांनी आपल्या सशक्त अभिनयाने या मालिकेला नवा आयाम दिला होता. त्यांची केमिस्ट्री, नाट्यमय ट्विस्ट आणि भावनिक कथा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. परंतु, कलाकारांमध्ये सतत होणाऱ्या बदलांनी आणि कथानकातील अनेक लीप्समुळे मालिकेचा जुना गारवा हळूहळू कमी होत गेला.
निर्मात्यांचा मोठा निर्णय
झी टीव्हीने मालिकेचा वेळ संध्याकाळी 7 वाजताच्या स्लॉट मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र एकता कपूरने त्या ऐवजी मालिका थांबवण्याचा निर्णय घेतला. आता त्या वेळेत ‘गंगा माई की बेटियाँ’ ही नवी मालिका प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
मृणाल ठाकूरसह अनेक कलाकारांची यशस्वी कारकीर्द
या मालिकेतून बॉलिवूडमध्ये झेप घेतलेली अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने ‘बुलबुल’ची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि ती आता मोठ्या पडद्यावर यशस्वी ठरली आहे.