20.4 C
New York

Broccoli can also be harmful : सुपरफूड’ ब्रोकोली सगळ्यांसाठी नाही! सेवन करण्याआधी नक्की विचार करा

Published:

आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं ही गरज बनली आहे. यामध्ये आहाराचं महत्त्व वेगळं सांगायची गरज नाही. हल्ली बऱ्याच लोकांनी आहारात ‘सुपरफूड’ म्हणून ओळखली जाणारी ब्रोकोली घेणं सुरू केलं आहे. ही हिरव्या रंगाची भाजी पोषणमूल्यांनी भरलेली असली तरी, सगळ्यांसाठी ती योग्यच असते असं नाही. काही आरोग्यदृष्ट्या विशेष परिस्थितीत असलेल्या व्यक्तींनी ब्रोकोली खाणं टाळणं किंवा मर्यादित प्रमाणातच घेणं आवश्यक आहे. चला तर पाहूया कोणत्या लोकांसाठी ब्रोकोली फायदेशीर नाही:

थायरॉईडच्या रुग्णांनी सावध राहावं

ब्रोकोलीमध्ये ‘गॉइट्रोजन’ नावाचा घटक असतो जो थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये अडथळा आणतो. हायपोथायरॉईडीझम असलेल्या लोकांनी ब्रोकोली खाल्ल्यास त्यांच्या थकवा, सुस्ती, वजनवाढ अशा लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे थायरॉईड रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ब्रोकोली खावी.

पोटफुगी आणि गॅसचा त्रास असल्यास टाळा

ब्रोकोलीमधील फायबर आणि काही विशिष्ट कार्बोहायड्रेट्स पचनास जड ठरू शकतात. ज्यांना पचनसंस्था कमजोर आहे किंवा गॅस, अपचन, पोट फुगणं यांचा त्रास होतो, त्यांनी ब्रोकोली मर्यादित खावी किंवा पूर्ण शिजवूनच घ्यावी.

रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर…

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन K भरपूर प्रमाणात असते, जे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत उपयोगी ठरतं. पण जर तुम्ही ब्लड थिनर (रक्त पातळ करणारी औषधे) घेत असाल, तर ब्रोकोलीमुळे त्या औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ब्रोकोली खाणं टाळावं.

किडनी स्टोनचा त्रास असल्यास मर्यादा ठेवा

ब्रोकोलीमध्ये असणाऱ्या पोटॅशियम आणि ऑक्सलेट मुळे काही रुग्णांमध्ये किडनी स्टोनच्या समस्या वाढू शकतात. या घटकांमुळे शरीरात कॅल्शियम ऑक्सलेट तयार होतं, जे स्टोनचा मुख्य घटक आहे. त्यामुळे किडनी स्टोन असणाऱ्यांनी आहारात ब्रोकोली समाविष्ट करताना काळजी घ्यावी.

गर्भवती महिलांसाठी देखील काळजी आवश्यक

गर्भधारणेत ब्रोकोलीमधील पोषण तत्त्वं फायदेशीर असली तरी, अतीप्रमाणात किंवा कच्ची ब्रोकोली खाल्ल्यास गॅस आणि अपचनाची तक्रार होऊ शकते. त्यामुळे या काळात ती सुपारीत प्रमाणात, चांगली शिजवून खाणं केव्हाही चांगलं ठरतं.

ब्रोकोली ही खरोखरच आरोग्यासाठी लाभदायक भाजी आहे, पण प्रत्येकाच्या शरीराची गरज वेगळी असते. त्यामुळे विशेष परिस्थितीतील व्यक्तींनी कोणताही ‘सुपरफूड’ आंधळेपणाने घेण्यापेक्षा योग्य माहिती घेऊन, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात समावेश करावा – हाच खरा शहाणपणा!

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img