20.4 C
New York

Beauty Tips : “काजल दिवसभर टिकवायचा आहे? मग या सोप्या ट्रिक्स वापराच!

Published:

काजल (Kajol) हा अनेक मुलींच्या मेकअप (Makeup) किटमधला आवडता आणि अत्यावश्यक भाग असतो. डोळ्यांना उठावदार, मोठं आणि आकर्षक लूक देण्यासाठी काजलचा वापर केला जातो. पण बऱ्याच वेळा काही तासांनंतर काजल पसरतो, विशेषतः दमट हवामानात, ज्यामुळे डोळ्यांखाली काळसर छटा तयार होते. ही अडचण टाळायची असेल, तर काही खास आणि सोप्या टिप्स लक्षात घेणं गरजेचं आहे.

काजल लावण्याआधी त्वचा नीट साफ करा:

काजल टिकण्यासाठी डोळ्यांच्या भोवतालचा भाग तेलमुक्त असणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर आधीच तेल किंवा क्रीम असेल, तर काजल लवकर पसरतो. यासाठी गुलाबपाणी, टोनर किंवा फेस वाइपने त्वचा स्वच्छ करून कोरडी करा.

प्राइमर किंवा कन्सीलरचा वापर करा:

काजल लावण्याआधी थोडासा प्राइमर किंवा कन्सीलर डोळ्यांच्या खाली लावल्यास काजल जास्त वेळ टिकतो. प्राइमर नसेल, तर कॉम्पॅक्ट किंवा टॅल्कम पावडरचा वापरही चालतो.

वॉटरप्रूफ आणि स्मज-प्रूफ काजल वापरा:

काजल निवडताना नेहमी असे प्रॉडक्ट घ्या जे पाण्यातून किंवा घामातून सहज निघणार नाही. वॉटरप्रूफ आणि स्मज-प्रूफ काजल दिवसभर टिकतो आणि पसरत नाही.

काजल लावल्यानंतर पावडरने सेट करा:

काजल लावल्यानंतर त्याच्या खाली थोडी ट्रान्सल्युसंट पावडर किंवा कॉम्पॅक्ट लावल्याने काजल हलत नाही. तेलकटपणा कमी होतो आणि लुक अधिक सेट दिसतो.

फक्त वॉटरलाइनवर काजल लावा:

डोळ्यांच्या वॉटरलाइनच्या बाहेर काजल लावल्यास तो सहज पसरतो. म्हणून शक्यतो काजल फक्त वॉटरलाइनवर वापरा. स्मोकी इफेक्ट हवा असल्यास, ब्लेंड करताना हलक्या हाताने करा.

डोळ्यांना वारंवार हात लावू नका:

काजल पसरण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे डोळ्यांना वारंवार हात लावणं. डोळ्यांमध्ये खाज आली तरी हाताने चोळू नका. त्याऐवजी टिशू पेपर किंवा स्वच्छ रुमालाने हलकं पुसा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img