20.4 C
New York

Asia Cup 2025: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सज्ज, संभाव्य संघ आणि सामना वेळापत्रक जाहीर

Published:

आगामी आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून 26 जुलै रोजी अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान खेळवली जाणार असून टी 20i फॉरमॅटमध्ये पार पडेल. सर्व सामने दुबई आणि अबुधाबी या दोन प्रमुख स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघाची अधिकृत घोषणा ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत मैदानात उतरणार आहे. वर्ल्ड कपनंतर सूर्या पूर्णवेळ कर्णधारपदी नियुक्त झाला असून, शस्त्रक्रियेनंतर आता तो पूर्णपणे फिट झाला आहे.

भारताचा संभाव्य संघ आणि खेळाडूंची भूमिका:

ओपनिंगसाठी स्पर्धा: शुभमन गिल (Shubhamn Gill), यशस्वी जैस्वाल (Yashashwi Jaiswal) आणि अभिषेक शर्मा (Abhishekh Sharma) यांच्यात अटीतटीची टक्कर.

मिडल ऑर्डरची मदार: हार्दिक पंड्या (Hardik Pandey), श्रेयस अय्यर (Shreyas iyer) (कमबॅकची शक्यता), ऋषभ पंत (Rishabh Pant).

फिनिशर म्हणून: रिंकू सिंगवर मोठी जबाबदारी येऊ शकते.

विकेटकीपरवर लक्ष: मुख्य कीपर म्हणून पंत निश्चित. परंतु संजू सॅमसन व ईशान किशन यांच्यात दुसऱ्या विकेटकीपरसाठी चुरस असेल. गेल्या काही महिन्यांपासून ईशान संघाबाहेर असल्याने संजूला संधी मिळण्याची अधिक शक्यता.

गोलंदाजी विभाग:

फिरकीपटू: कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर.

वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज.

ऑलराउंडर बॅकअप: हार्दिक पंड्या, सुंदर आणि अक्षर बहुपयोगी ठरतील.

भारताचे साखळी फेरीतील सामने:

  1. 10 सप्टेंबर: भारत vs UAE – दुबई
  2. 14 सप्टेंबर: भारत vs पाकिस्तान – दुबई
  3. 19 सप्टेंबर: भारत vs ओमान – अबुधाबी संभाव्य भारतीय संघ (2025 आशिया कप):

शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, ईशान किशन/संजू सॅमसन

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img