20.6 C
New York

Uttarakhand Flash Flood : उत्तरकाशीमध्ये नांदेडचे 11 भाविक अडकले!

Published:

उत्तराखंडमधील (Utterkhand) उत्तरकाशीच्या (Utterkashi) धराली भागात काल दुपारी मोठी ढगफुटी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. गावात आणि परिसरात मोठे नुकसान झाले असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी आणि काही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

या घटनेदरम्यान महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील डोणगाव गावातील 11 भाविक केदारनाथ-बद्रीनाथ (Kedarthnath – badarinath) यात्रेवर असताना अडकले आहेत. 1 ऑगस्टला नांदेडहून निघालेल्या या गटातील 7 जण एका ठिकाणी तर 4 जण दुसऱ्या ठिकाणी आहेत. सुदैवाने ते घटनास्थळापासून सुमारे 150 किमी दूर आणि सुरक्षित आहेत.

जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांच्याशी संपर्क साधला असून, इतर कोणी नांदेडमधील नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले असतील तर जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या त्या भागात मुसळधार पाऊस व रस्ते बंद असल्याने पर्यटकांनी तिकडे जाणे टाळावे, असा सल्ला स्थानिकांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img