19.9 C
New York

Hindustani bhau over kolhapur madhuri : कोल्हापूरचा अपमान करणाऱ्या ‘हिंदुस्थानी भाऊ’ला कोल्हापुरी पायताणाने चोपण्याचा इशारा

Published:

कोल्हापुरातील (Kolhapur) माधुरी हत्तीण (Madhuri Elephant) प्रकरण गाजत असतानाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ (Hindustani Bhau)ने एक व्हिडिओ पोस्ट करून कोल्हापूरकरांना अर्वाच्च शिवीगाळ केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे नेते प्रशांत भिसे (Prashant Bhise) यांनी या प्रकरणावर जोरदार प्रतिक्रिया देत भाऊला कोल्हापुरी पायताणाने चोप देण्याचा इशारा दिला आहे.

भिसेंनी सांगितले की, एका परप्रांतीयाने धनाढ्यांच्या बाजूने उभे राहून मराठी माणसांच्या आई-बहिणींवरून अश्लील भाषेत बोलणे ही असह्य गोष्ट आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात कारवाईची मागणी केली. तसेच, “मराठी माणसांच्या नादी लागू नकोस, कोल्हापुरी चप्पल लक्षात ठेव, यानं तोंड फोडणारच,” अशा शब्दांत हिंदुस्थानी भाऊला थेट धमकी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img