सध्या हॉलिवूड ते बॉलिवूडपर्यंत लबूबू डॉलची (Labbu Dolls) जोरदार क्रेझ दिसते आहे. मात्र या बाहुलीला काही लोक अपशकुनी मानतात. कॉमेडियन भारती सिंगलाही (Bharti Singh) असाच अनुभव आला. तिचा पती हर्ष (Harsh) लिंबाचियाने मुलगा गोला साठी लबूबू डॉल आणली. पण बाहुली घरात आल्यापासून गोला चिडचिडा, मस्तीखोर आणि ऐकून न घेणारा झाला.
सुरुवातीला भारतीने हा बदल दुर्लक्षिला, पण इतरांच्या सांगण्यावरून तिला बाहुलीबद्दल संशय आला. तिने 3–4 वेळा बाहुली जाळण्याचा प्रयत्न केला पण ती जळत नव्हती, ज्यामुळे भारती घाबरली. अखेर तिने बाहुलीला पेपरमध्ये गुंडाळून पेटवले आणि ती जळली.
व्हिडीओ शेअर करत भारती म्हणाली, “वाईट गोष्टीचा अंत आणि सत्याचा विजय झाला.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.