19.9 C
New York

Bachchu Kadu Meets Raj Thackeray : शेतकऱ्यांसाठी मुंबई बंदची मागणी; बच्चू कडूंची राज ठाकरेंशी भेट

Published:

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackkery) यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या आणि आगामी आंदोलनांबाबत चर्चा केली. कडूंनी यवतमाळमध्ये होणाऱ्या यात्रेला राज ठाकरे यांना आमंत्रित केले आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी एक दिवस मुंबई बंद ठेवण्याची मागणी केली.

पत्रकारांशी बोलताना कडूंनी (Bacchu Kadu) सांगितले की आंदोलन त्यांच्यापुरते न राहता सर्व शेतकऱ्यांचे असावे, हा उद्देश आहे. सरकार शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेत नाही आणि दुष्काळाची वाट पाहत आहे, अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मागील दोन वर्षांपासून शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मनसे सोबत आल्यास आंदोलनाला बळ मिळेल, पण हा राजकीय अजेंडा नसून मरणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे, असे कडूंनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅट निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img