मुंबईतील कबूतरखाने बंदी संदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांनी कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. तसेच वेळ पडली तर यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा?
पालिकेच्या एक कमिटी गठीत होणार आहे. तसेच कबूतरखान्याचं पाणी बंद करण्यात आलं होतं. ते पुन्हा जोडण्यात आलं आहे. बंद केलेले कबूतर खाने पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मी सर्व जैन, हिंदू आणि अहिंसक समाजा तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो. त्यांनी सांगितलं की, कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही. तसेच वेळ पडली तर यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
आरोग्याच्या दृष्टीने हे कबूतरखाने धोकादायक असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर या विषयाला वाचा फुटली होती. मात्र कबूतरखाने अचानक बंद करणे योग्य नसल्याची भूमिका जैन समाजाने घेतली होती. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील मुख्यमंत्र्यांनी या कबूतर खान्यांना अभय दिलं आहे. तसेच यावर मंत्री लोढा यांनी आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.
या कबूतरखान्यांमध्ये कबूतरांच्या खान्याच्या वेळा ठरवल्या जाणार आहेत. साफसफाईसाठी देखील योग्य यंत्रणा राबवली जाणार आहे. यावर मनपा सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणार आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.